मी लवकरच मंत्रिमंडळात : नारायण राणे

0

कुडाळ : मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश होईल, असे वक्तव्य महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनी केले आहे. कुडाळ येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासाबाबत बोलायचे झाल्यास मागील तीन वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा दहा वर्ष मागे गेल्याची आजची स्थिती आहे.

निवडणुकांच्या काळात करण्यात आलेला जाहीरनामा व घोषणांची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. या सर्वाला जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार आहेत. पालकमंत्र्यांना अधिकारी ऐकत नाहीत हे दुर्दैव असून गेल्या तीन वर्षात शून्य काम असणारे निष्क्रिय पालकमंत्री असल्याची टीका नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली आहे. तसेच, कोकणात होवू घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला सुद्धा नारायण राणे यांनी विरोध दर्शविला.