मी सिंगल आहे. सिंगल राहण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. सध्या तरी लग्न करून संसार थाटण्यासाठी मला वेळच मिळत नाहीए आणि लग्नाच्या बाबतीत मी काहीही विचार केलेला नाही. कारण मी गुंतागुंतीच्या नात्यात अडकून बसले आहे, अशी सल अभिनेत्री कंगना रावत हिने बोलून दाखविली. पण सिमरन हिट झाल्यास मला संसार थाटता येईल, असही तिने सांगितलं.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं पुरस्कार सोहळ्यांतील सेटिंगचा पर्दाफाश केला. ’पुरस्कार सोहळे हे एक नंबरचे फ्रॉड असतात. त्यात पक्षपात होत असतो. हे सोहळे म्हणजे एक प्रकारची फसवणूक असते. तुम्हीही ते पाहू नका. या सोहळ्यांचा एक ठरीव साचा असतो. एक कंपू तयार झालेला असतो. सोहळ्यांमध्ये परफॉर्मन्स केल्यानंतर अभिनेत्यांना पैसे द्यावे लागतात. ते द्यावे लागू नयेत म्हणून आयोजक त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करतात,’ असा गौप्यस्फोट तिनं केला. पुरस्कार सोहळ्यात कंपूबाजी चालत असल्याने उद्या मला जर ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला तरी स्वीकारायला जाणार नाही, असेही तिने बिनदिक्कतपणे सांगून टाकले.
’वर्षातून एकदाच पुरस्कार मिळतो आणि पुरस्कार मिळाल्यानंतर वर्षभर चर्चेत राहता येते. जे कलाकार आयोजकांना मस्का लावतात, त्यांना पुरस्कार दिला जातो. या सोहळ्यांमध्ये उघडपणे पक्षपातीपणा होत असतो. त्यामुळे असला माहोल माझ्या पचनी पडत नाही. परिणामी मला हे पुरस्कार घेणे आवडत नाही, असेही ती म्हणाली. ’राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये टीआरपीची भानगड नसते.