मी सुद्धा राजपूत! एकालाही सोडणार नाही – कंगना रनौत

0

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतचा ‘मणिकर्णिका-द क्विन ऑफ झांशी’ हा चित्रपट रिलीज होणाच्या मार्गावर आहे. आता पुन्हा एकदा हा चित्रपट वादात अडकला आहे. करणी सेनेने या चित्रपटातील एका दृष्यावर आक्षेप घेत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याची धमकी दिली आहे.

करणी सेनेने केलेल्या आरोपानुसार, चित्रपटात राणी लक्ष्मीबाईचे ब्रिटीश अधिकाऱयांसोबत जवळचे संबध दाखविण्यात आले आहेत. तसेच, राणी लक्ष्मीबाई या चित्रपटात डान्सही असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे सर्व खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. कंगनाने मात्र, करणी सेनेने जशास तसे उत्तर देत चित्रपट प्रदर्शित होणारच असे म्हटले आहे.