मी हे नातं टिकवण्यासाठी तब्बल २१ वर्षे प्रयत्न केले – अरबाज खान

0

मुंबई : बॉलिवूडचा सर्वात रोमॅन्टिक कपल म्हणून अरबाज खान आणि मलायका अरोरा यांना ओळखले जात होते. लग्नाचे १७ वर्षे एकमेकांसोबत व्यतीत केल्यानंतर या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ‘मी हे नातं टिकवण्यासाठी तब्बल २१ वर्षे प्रयत्न केले, पण ते टिकू शकले नाही’,असे अरबाज म्हणाला.

अरबाज खानने त्याच्या आणि मलायकाच्या नात्याबद्दल भावना व्यक्त केल्या. ‘आपण कोणत्याही गोष्टीत कधीच परिपूर्ण असू शकत नाही. आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. मीदेखील २१ वर्षे आमचे नाते टिकवण्याचा प्रयत्न केला, पण ठिक आहे. यापेक्षा जास्त काळ कोणीही प्रयत्न करू शकणार नाही’, असे अरबाजने सांगितले.

अरबाज खान आणि मलायका अरोरा आता त्यांच्या आयुष्यात बरेच पुढे निघून गेले आहेत. अरबाजचे नाव त्याची ईटालियन गर्लफ्रेन्ड जॉर्जिया अॅन्ड्रियानीसोबत जोडले जात आहे, तर मलायका अर्जून कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.