भुसावळ। शेतकर्यांना पेरणीपूर्व सरककट कर्जमाफीसह विज बिल माफ करण्यात यावे, शेतमालास हमीभाव मिळावा या मुख्य मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी भुसावळ तालुका शेतकरी संघर्ष चळवळतर्फे बुधवार 7 रोजी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी आपले मुंडन केले तसेच कांदे व दूध रस्त्यावर फेकून आपला रोष व्यक्त केला. यानंतर प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्यांनी सरकार विरोधात निदर्शने केल्यामुळे संपुर्ण परिसर दणाणून निघाला. प्रांतांंना निवेदन स्विकारण्यासाठी बाहेर बोलविण्यात आले मात्र ते न आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
प्रांतांची भेट घेऊन दिले मागण्यांचे निवेदन
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोपान भारंबे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी, अनिल श्रीधर महाजन, नारायण पाचपांडे, दिलीप फालक, दीपक भोळे, हीरामण भोळे, अनिल त्रंबक महाजन, शांताराम सरोदे, सुधारक भारंबे, रामा वारके, किरण पाटील, लखनसिंग पाटील, जितेंद्र चोपडे यांनी प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
शासनाने लक्ष देण्याची मागणी
निवेदनात नमूद करण्यात आले की, गेल्या तिन वर्षातील नैसर्गीक आपत्ती, शासकीय धोरण, वाढती महागाई आणि शेतीमालाला मिळणारा अत्यल्प दरामुळे शेती व शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. तसेच सोसायटी, बँकांच्या कर्जाने शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्यांसारख्या मार्गाकडे वळत आहे. शेतीचा खर्च शेतकर्यांच्या आवाक्यात राहिलेला नाही. संतप्त शेतकरी पुनर्वसनासाठी धडपडत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनात यांचा होता सहभाग
या आंदोलनात वासुदेव फेगडे, संजय भारंबे, संतोष फेगडे, अनिल भारंबे, वासूदेव धांडे, लक्ष्मण भोळे, शब्बीर ताजमोहम्मंद बागवान, शामसिंग पाटील, संग्रामसिंग पाटील, गजानन सरोदे, सचिन भोळे, माजी. जिल्हा परिषद सदस्या सुरेखा सोपान भारंबे, सुवर्णा इंगळे, संगीता पाचपांडे, रत्नमाला फेगडे, कांचन भोळे, उज्वला फेगडे, निर्मला तायडे, खडका उपसरपंच रईसखान लोधी, मुरलीधर धांडे, नवलसिंग राजपूत, सुरेश शिंदे, दायाराम टोंगळे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला.
यावल येथे काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन
काँग्रेसतर्फे बुरुज चौकात रास्तारोको आंदोेलन करण्यात आले यानंतर पदाधिकार्यांनी तहसिलदारांना आपल्या मागण्यांसदर्भात निवेदन दिले. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, जावेद मोहंमद, कबीरोद्दीन जहीरोद्दीन सैय्यद कौसरअली शौकत अली, उपसभापती उमाकांत पाटील, कादीर खान, जलील पटेल, माजी सभापती लिलाधर चौधरी, अनिल महाजन, असलम शबी, भागवत पाचपोळे, अनिल साठे, उपसरपंच अकील मारुळ, केतन किरंगे, शेख रियाज शेख साबीर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या मागण्या
शेतकर्यांना पेरणीपूर्व कर्जमाफी मिळणे, स्वामीनाथन आयोगाचा अहवाल जैसे-थे स्विकारुन राज्यात प्रभावी अंमलबजावणी करणे, शेतीमालाचे हमीभाव निश्चित करणे, दुधाला 50 रुपये प्रति लिटर दर देणे, रक्तातील नात्यात शेतीची वाटणी, विभाजन करतांना मुद्रांक माफ करणे, शेतीत राबणार्या शेतमजुराला मनरेजा योजनेअंतर्गत रोजंदारी देणे. शेतीशी संबंधीत जोडव्यवसाय मुद्रा बँकेच्या कार्यकक्षेत घेऊन विनातारण स्वतंत्र किसान मुद्रा योजना राबविणे. बियाणे, रासायनिक खत, किटकनाशके व वीज माफकदरात उपलब्ध करुन देणे. लोधडे, निलगााय व अन्य उपद्रवी वन्यप्राण्यांकडून होणारे शेतीमालाचे नुकसान रोखण्याची जबाबदारी वनखात्यावर निश्चीत करुन वनखात्यामार्फत नुकसान भरपाई मिळणे. शेतकर्यांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन लागू करणे.