मुंडे चांगलेच; त्यांना समजून घ्या : खा. शिरोळे

0

पुणे : पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे हे एक उत्तम अधिकारी असून, त्यांना समजून घेण्याची गरज आहे, असे मत खा. अनिल शिरोळे यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना व्यक्त केले. महापालिकेतील पदाधिकारी आणि मुंडे यांच्यात समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेण्याची आपली तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दैनिक जनशक्तिच्या पुणे आवृत्ती कार्यालयास गुरुवारी खा. शिरोळे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी शहरातील समस्यांसह विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली. याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक किरण चौधरी यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. निवासी संपादक पुरुषोत्तम सांगळे, सहसंपादक अजय सोनावणे, वृत्तसंपादक राजेंद्र पंढरपुरे, मुख्य उपसंपादक श्रीपाद आठल्ये यांच्यासह संपादकीय सहकारी याप्रसंगी उपस्थित होते.