मुंडे साहेबांचे कार्य जिवंत झर्‍या सारखे!

0

वरणगाव : आजच्या आधुनिक काळात विविध क्षेत्रास झपाट्याने बदल होत आहेत. त्यामुळे काळानुरुप समाजालाही बदलाची आवश्यकता आहे. तरूणानी समाजहितासाठी एकत्र येण्याची गरज आहे. जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर स्वर्गवाशी गोपीनाथ मुंडे साहेबांचे कार्य जिवंत झर्‍या सारखे करावे, असे प्रतिपादन साहित्यिक कवी प्रा. वा.ना. आंधळे यांनी केले. लोकनेते गोपीनाथ मूंडे 67 जयंतीनिमीत्त व्याख्यानात बोलत होते.

भगवान सेनेतर्फे सत्कार
यावेळी आमदार संजय सावकारे, चंद्रकांत बढे, पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी, उपसभापती गोलू पाटील, तालुका अध्यक्ष सुधाकर जावळे, उपनगराध्यक्ष शेख अरवलाक, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रविंद्र सोनवणे, अलाउद्दीन, कामगार नेते मिलींद मेढे, सुकलाल धनगर, जिल्हा अध्यक्ष सुनिल नेवे, गणेश धनगर, बबलू माळी, दिनेश नेमाडे, शहर अध्यक्ष इफ्तेखार मिर्जा, शेख सईद, नगरसेविका वैशाली देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन भगवान सेनेतर्फे मान्यवरांचा सत्कार झाला.

बालपनापासूनच्या आठवीनींना उजाळा
प्रा. आंधळे म्हणाले की, मुंडे साहेबांनी राजकारणात राहून एका जातीपातीचे नाही तर सर्व समाजाला घेवून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्याचा जनसामान्य मानसात वावर होता. ज्याने कार्यकर्ता सांबळला तो तळागाळा प्रयत्न पोहचतो. तरूणांनी पुस्तक वाचत असतांना माणसे ओळखण्याची गरज आहे. राजकारणात कुलगुरु मुंडे साहेबची ओळख होती. आंधळे यांनी त्यांच्या व्याख्यानात मुंडे साहेबांच्या बालपनापासूनच्या आठवीनींना उजाळा दिला. त्यांचे कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हे ते सर्व समाजाला बरोबर घेऊन चालण्याची ताकत होती. मुंडे साहेबांचा आदर्श तरुणांनी घ्यावा. तसेच आई मला जन्माला येऊ दे या कवितेचे साहित्यिक प्रा. वा.ना. आंधेळे यांनी व्याख्यानात सांगीतले.

यांनी घेतले परिश्रम
सर्वप्रथम लोकनेते स्वर्गवाशी गोपीनाथ मुंडे यांची जयंती काढण्यात आली. कार्यकमाचे प्रास्ताविक नगरसेवक सुनील काळे यांनी केले तर सूत्रसंचालन महेश सोनवणे यानी केले तर आभार किरण धुंदले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुधाकर वंजारी, रमेश पालवे, सुधाकर बावने, विजय बावने, प्रदीप काळे, किरण वंजारी, किरण काळे, नीलेश काळे, हर्षल वंजारी, अतुल वंजारी, प्रशांत बावने, अनिल वंजारी, शामराव धनगर, नामदेव मोरे, एकनाथ भोई, सागर वंजारी आदी समाज बांधवांनी व भगवान बाबा सेनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.