मुंढेच्या बदलीविरोधात न्यायालयात धाव

0

नवी मुंबई। नवी मुंबईतील भूमाफिया, राजकीय नेते, ठेकेदार आणि महापालिकेतील ठराविक अधिकार्‍यांच्या अभद्र युतीला धडाकेबाज कामगिरीने वर्षभर सळो की पळो करुन सोडणार्‍या तुकाराम मुंढे या अधिकार्‍याची अचानक बदली करण्यात आल्याने या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा आरटीआई कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी दिला आहे.

मुंढेच्या बदलीने अनेक बेकायदेशीर कामांना अभय मिळू शकते असा इशारा त्यांनी दिला आहे. दिघावासियांच्या अतिक्रमणाचा मुद्दा न्यायालयात असतानाच त्या बरोबर नवी मुंबईतील अनेक अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ही प्रलंबित आहे. यातच मुंढे यांची अचानक बदली करण्यात आल्याने न्यायालय प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात अशी भीती मिश्रा यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने सर्व नियम धाब्यावर बसवत न्यायालयात अशी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते की ज्यामुळे सर्वच अनधिकृत बांधकामे अधिकृत होतील. याचा विरोध करत मुंढे यांनी केल्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली केली.