मुंदखेडेत धाडसी घरफोडी : गावातील चोरट्यांना चाळीसगाव पोलिसांनी घातल्या बेड्या

भुसावळ/चाळीसगाव : तालुक्यातील मुंदखेड येथील वयोवृद्धाच्या घरातून पावणे चार लाखांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर गावातीलच महिला व पुरूष आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून संशयीतांकडून दोन लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. योगेश राजेंद्र कुमावत (25) व छायाबाई ऊर्फ वर्षा नारायण पाटील (33, दोन्ही रा.मुंदखेडे, ता.चाळीसगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

जानेवारी महिन्यात झाली होती चोरी
मुंदखेड बु.॥ येथील रामदास धना पाटील (82) यांच्या राहत्या घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड मिळून तीन लाख 87 हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. ही घटना 14 जानेवारी 2022 रोजी रात्री 9 ते 15 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजे दरम्यान घडली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळण्यता यश आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे, चाळीसगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक संजय ठेंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसस उपनिरीक्षक लोकेश पवार, एएसआय राजेंद्र साळुंखे, हवालदार नितीन सोनवणे, महिला नाईक मालती बच्छाव, नाईक शंकर जंजाळे, नाईक संदीप माने, नाईक मनोज पाटील, नाईक भूपेश वंजारी, नाईक गोवर्धन राजेंद्र बोरसे, नाईक शांताराम सीताराम पवार, नाईक प्रेमसिंग राठोड आदींच्या पथकाने केली. तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लोकेश पवार व नाईक भूपेश वंजारी करीत आहेत.