मुंबईकरांचा खिसा शाबूत

0

मुंबई । मुंबई महापालिकेचा 2018-2019 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना हा अर्थसंकल्प सादर केला. 27 हजार 258 कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना कोणतीही करवाढ न करता महापालिका आयुक्तांनी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प साडेआठ टक्क्यांंनी वाढला आहे. या अर्थसंकल्पात आरोग्य, रस्ते आणि प्रकल्पांच्या कामावर अधिक भर देण्यात आला आहे.

विशेषत: उपनगरीय रुग्णालयांच्या बळकटीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. पण यावेळच्या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा होतील याची शक्यता फारच कमी आहे. कारण आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असताना पालिकेची तिजोरी रिकामी असल्याचे दिसून येत आहे. हा अर्थसंकल्प हा गेल्या वर्षीपेक्षा 8.13 टक्क्यांनी अधिक आहे, यामध्ये महसुली खर्चावर 17723.25 कोटी, तर भांडवली खर्चासाठी 9527.80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादली नसली तरी उत्पन्न वाढीसाठी महानगरपालिकेकडून वसुली करण्यात येणार्‍या शुल्कात सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये कारखाना परवाना शुल्क, घाऊक बाजार तसेच पालिका रुग्णालयातील वैद्यकीय शुल्काचा समावेश आहे. सन 2018 – 19 अर्थसंकल्पात महसूल खर्चासाठी 17723.25 कोटी खर्च होणार असून भांडवली खर्चासाठी एकूण 9 हजार 527. 80 कोटींची तरतूद केली आहे. महसूल उत्पन्नामध्ये जकात पोटी येणारे अनुदान 8401. 19 कोटी प्रास्ताविले असून मालमत्ता करापोटी 5206.15 इतके उत्पन्न अपेक्षिले आहे.

डिसेंबरच्या अखेरीस राज्य शासनाकडून मालमत्ता कर, जल व मलनिस्सारण कर, शासनाच्या वतीने जमा केलेल्या कराच्या हिश्याची वसुली, अनुदान इत्यादी पोटी 3901. 91 कोटी इतकी रक्कम येणे बाकी आहे, तर पालिकेकडून शासनास 249. 71 कोटी रक्कम देणे आहे.

‘बेस्ट’ला आर्थिक साहाय्य
सन 2018-19 मध्ये डेपो ऑटोमेशन आणि प्रवासी माहिती प्रणाली पीआयएसच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येकी 50 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या मोफत बस पास पोटी बेस्टला 65 कोटी देण्याचे प्रस्तावित आहे, तर कर्मचारी केंद्रित उपाययोजना म्हणून बेस्ट कर्मचार्‍यांच्या मोडकळीस आलेल्या वसाहतींच्या दुरुस्तीसाठी 10 कोटींची तरतूद केली असून रस्त्यांवरील एलईडी दिव्यांसाठी 28 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

कचर्‍यापासून ऊर्जा निर्मिती
देवनार येथे कचर्‍यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याची योजना पालिकेकडून हाती घेण्यात येणार असून यासाठी 110 कोटींची तरतूद प्रस्तावित आहे , यामध्ये 600 मे . टन प्रती दिन क्षमतेच्या कचर्‍यापासून ऊर्जानिर्मिती उभारण्यात येणार असून यासाठीच्या निविदेचे काम अंतिम टप्प्यात आहे तसेच कचर्‍यावर बायो मायनिंग प्रक्रियेसाठी 65 कोटींची तरतूद केली आहे.

अर्थसंकल्पात कोणाला किती निधी देणार?
सागरी किनार्‍यांच्या सुशोभीकरणासाठी 10 कोटी
नवीन अग्निशमन केंद्रांसाठी 29.97 कोटी
मेडिकल आणि डेंटल कॉलेजसाठी 10 कोटी
सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसाठी 7 कोटी
प्राण्यांपासून माणसांना होणार्‍या रोगांच्या निदानासाठी झुनॉटिक लॅब तयार करणार
वांद्रे किल्ल्यासाठी 5 कोटी
टीबीसाठी 3.5 कोटी
पश्‍चिम उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी 35 कोटी
दिव्यांगांसाठी बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास
गावठाण कोळीवाडे आणि आदिवासी पाडे 15.6 कोटी, आधार केंद्रे 1.04 कोटी, गलिच्छ वस्त्यांचा दर्जा उन्नतीसाठी 695.07 कोटी, गरीब वर्गासाठीच्या चाळींकरिता इमारती सुधारणेच्या व्यवस्थापनासाठी 350.71 कोटी
सायन रुग्णालयासाठी 1 हजार कोटी
टाटा कंपाऊंड येथील हिंदुहृदयसमाट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाकरिता वसतिगृहाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.
रुग्णालयांमध्ये 230 व्हेंटिलेटर येणार, 16 कोटींची तरतूद
अग्निशमन विभागात 96 महिला कर्मचार्‍यांचा समावेश
शीव रुग्णालयासाठी 1 हजार कोटींची तरतूद
मुंबईत 7 सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार, 538 कोटींची तरतूद
भायखळा प्राणिसंग्रहालयाचा 7 एकरांपर्यंत विस्तार
25 दवाखाने दुरुस्ती करता निश्‍चित करण्यात येणार आहे. याकरिता अर्थसंकल्पात 1.05 कोटींची तरतूद
मलनिस्सारण व्यवस्था पूर्णपणे यांत्रिक करण्यासाठी 42.45 कोटींची तरतूद
गावठाण कोळीवाडे आणि आदिवासी पाड्यांसाठी 15.6 कोटी
तानसा पाइपलाइनच्या बाजूला सायकल ट्रॅकसाठी 100 कोटी
शहरी गरिबांना सेवा पुरावण्यामध्ये एकूण 8472 कोटी
मुंबईतील रहिवाशांसाठी वैद्यकीय सेवांच्या दरात अंदाजे 20 टक्के इतकी वाढ, तर मुंबई बाहेरील रहिवाशांसाठी 30 टक्क्यांपर्यंत वाढ, ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार
मुंबईत सार्वजनिक शौचालयांवरच्या जाहिरातीमधून महसूल उत्पन्न मिळवणार
आपत्ती व्यवस्थापनासाठी 11.69 कोटी
पूर नियंत्रणासाठी 53 कोटी
मॅनहोलमध्ये 1450 जाळ्या बसवणार
स्वच्छ भारतसाठी 10 कोटी
खड्डे बुजवण्यासाठी विशेष प्लांट
एलईडी दिव्यांसाठी 28 कोटी
पार्किंग व्यवस्थेसाठी 1 कोटी
महालक्ष्मी ते हाजीअली आणि महालक्ष्मी ते वरळीनाका असे दोन नवीन उड्डाणपूल बांधणार
रस्त्यांसाठी 1202 कोटी
गोरेगाव मुलुंड जोडरस्त्यासाठी 100 कोटी
कोस्टल रोडसाठी 1500 कोटी
345 शालेय इमारतीमध्ये 381 सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवणार
महापालिका शाळांच्या मुलांना फुटबॉल प्रशिक्षण
मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण
हस्ताक्षर सुधारण्यास आरक्षित प्रस्ताव
केईएम, सायन, नायर रुग्णालयांमध्ये उभारण्यात येणार्‍या कॅथलॅबसाठी 12 कोटी रुपये मंजूर
केईएम, कुपर रुग्णालयासाठी डिजिटल सबस्टेशन अ‍ॅन्जिओग्राफी मशीन खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये
सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी
1500 कोटी रुपये
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये
रस्ते प्रकल्पांसाठी 2058.92 कोटी
गावठाणांमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 1 कोटी रुपये
मिठी नदीसाठी 15 कोटींची तरतूद
घनकचरा खात्यासाठी 283 कोटी रुपये
डम्पिंग ग्राऊंडचा विकास 209 कोटी रुपये
तलाव व नद्यांच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये
राणीबागेचा विकासासाठी 50 कोटींची तरतूद
अग्निशमन दलासाठी 180 कोटींची तरतूद
मंडयांमध्ये कचर्‍याची प्रक्रिया 12 कोटी रुपये
टेक्सटाइल म्युझियमसाठी 25 कोटींची तरतूद