मुंबईकरांचे पाणी महागले

0

मुंबई । सामान्य जनता आधीच महागाईचे चटके सोसत असताना मुंबईकरांसाठी आता पाणीही महाग झाले आहे. आज झालेल्या स्थायी समिती सभेत पाण्याच्या दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला. मात्र या पाणीदरवाढीच्या प्रस्तावावर कोणतीही चाचा न होता सादर प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे मुंबईतील पाणीपट्टीत 3.72 टक्के दरवाढ होणार असल्याने मुंबईकरांना आर्थिक भाराला सामोरे जावे लागणार आहे. ही पाणीपट्टीवाढ घरगुती आणि व्यावसायिक अशी सरसकट सगळ्यांसाठीच असणार आहे.

येत्या 16 जूनपासून ही पाणीपट्टीवाढ लागू केली जाणार आहे. पाणीपट्टीत 3.72 टक्के वाढ झाल्यानंतर झोपडपट्टीतील पाणीदरात प्रती हजार लिटर्सचा दर 4.08 रुपयांवरून 4.23 रुपये होणार आहे तर अन्य घरगुती वापरातील पाण्याच्या दरात 4.91 रुपयांवरून 5.09 रुपये, व्यावसायिक दरात 36.88 रुपयांवरून 38.25 रुपये वाढ होणार आहे. त्यावर नियमानुसार 70 टक्के मलनि:सारण शुल्कही आकारले जाणार आहे.