मुंबईकरांचे रक्षाबंधन आटीतटीत! बेस्ट बंदचा फटका

0

मुंबई – मुंबईत आज महापालिका परिवहन सेवा अर्थात बेस्ट बस कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना आपल्या बहिणीच्या घरी तर बहिणींला भावाच्या घरी जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. यामुळे यावर्षीचे रक्षाबंधन हे मुंबईकरांसाठी आटीतटीचे गेले. बहिण भावांचे नाते हे दुधाच्या साईप्रमाणे असल्यामुळे दोघांकडूनही निश्चीत स्थळी पोहचण्यासाठी जीवांची बाजी लावण्यात येत होती. त्यासाठी कितीही संकटे, अडथळे आले, तरी ते पार करण्यात येत होती. यामुळे मुंबईकरांची यंदाची रक्षाबंधन ही आटीतटीत पार पडल्याचे चित्र दिसून आले.

बेस्ट कामगारांनी केलेल्या संपामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना घरापासून सोय असलेली बस सेवा बंद असल्याने अनेकांना रेल्वे स्थानकांपर्यत पोहचण्यासाठी रिक्षावर अवलंबून राहावे लागले. यामुळे रिक्षाचालकांनीही चांगलाच भाव आला होता. काहीवेळा त्यांनी भाडे नाकारण्याचे प्रकारही दिसून आले. यामुळे रिक्षाबंधनासाठी निघालेल्या नागरिकांना रिक्षासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागले. सुभाम शिवदास याला विरार येथील आपल्या बहिणीकडे जाण्यासाठी कांदिवली येथील रिक्षा स्टॅण्डवर एक तास रिक्षाची वाट पाहवी लागली. त्यांच्याजवळ दहा किलो तांदळानी भरलेली बॅग होती. तरीही रिक्षावाल्यांना त्यांची दया आली नाही. त्यांनी आपली कैफत एका रिक्षाचालकांला सांगितल्यावर कारभार गाडेकर या रिक्षाचालकानी त्यांला कांदिवली रेल्वे स्टेशनला सोडले.यानंतर तो रेल्वेने विरार येथील आपल्या बहिणीच्या घरी पोहचला.

रिक्षावाल्यांकडून प्रवाश्यांची लुट
अंधेरी पूर्व येथे सहार गाव,जेबीनगर,सहार विमानतळ आदि ठिकाणी जाणासाठी सकाळपासूनचं रिक्षा पकडण्यासाठी रांगाच रांगा लागले होते.त्यात सहार ते अंधेरी जाण्यासाठी १० रुपये शेअर असताना २० ते ३० रुपये भाडे रिक्षाचालक प्रवाश्यांकडून घेत आहेत.संध्याकाळी तर हेच भाडे ५० रुपये पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रिक्षावाल्यांनी प्रवाश्यांकडून जास्त भाडे आकारल्यास त्या रिक्षाचालकावर दंडात्मक कार्यवाई केली जाईल.प्रवाश्यांनी कोणत्याही रिक्षाचालकास जादा भाडे देवू नये.त्याची तक्रार त्याठिकाणी असलेल्या ट्रॉफिक पोलीसांना करावी.
पंकज शिरसाट.सहायक पोलीस आयुक्त. पश्चिम द्रुतगती हायवे