मुंबई: संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. भारतातील सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहे. दरम्यान आता मुंबईकरांसाठी काहीशी दिलासा दायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील कोरोना वाढीचा दर ओसरला आहे. रुग्ण वाढीचा दर 6.5 वरून 3.5 वर आला आहे. मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या भागातील ही कोरोना वाढीचा दर ओसरला आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जात आहे.