मुंबई: आज सुट्टीच्या दिवशी अखेर मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील आज, रविवारचे एकूण पाच ब्लॉक रेल्वेने रद्द केले आहेत. त्यासाठी ‘अपरिहार्यते’चे कारण देण्यात आले आहे. मध्य रेल्वेने आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉकसह बदलापूर-कर्जत मार्गावर स. १०.३० ते दु. ३ या वेळेत विशेष ब्लॉक जाहीर केला होता. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकादरम्यान ब्लॉक होते. तर, पश्चिम रेल्वेवरही पुलासाठीच्या गर्डर उभारणीसाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार होता. प्रभादेवी ते चर्चगेट, चर्चगेट ते मुंबई सेंट्रल असाही मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र हे सर्व ब्लॉक रद्द करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे.