म्हसळा : माणूस ज्या मातीत जन्माला आला त्या मायभुमीचे तो देणेकरी असतो आणि म्हणुनच गावाकडची मंडळी उदरर्निवाहासाठी रोजगार व कामधंद्यानिमित्त मुंबई सारख्या शहरात वास्तव्य करण्यास येत असतात. असे असले तरी मुंबईकरांनी ग्रामिण भागाचे संस्कार जपणे अत्यावश्यक असल्याचा मार्मिक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश अध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा, श्रीवर्धन, तळा तालुका मुंबई निवासी कार्यकर्ते यांस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आयोजित कार्यक्रमात दिला आहे. मुंबई दादर येथे शिवाजी मंदिर येथील सभागृहात संपन्न झालेल्या भव्य सत्कार कार्यक्रमाला आमदार सुनिल तटकरे यांच्या समवेत मुंबई प्रदेश उपाध्यक्ष दाजी विचारे, युवानेते अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा, तळा, श्रीवर्धन या तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयी मेळावा आणि आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व 10 वी 12 वी विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रमांचे आयोजन युवानेते अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या वेळी आमदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेडोपाडयात कोट्यावधी रुपयांची विकास कामे करून आम जनतेची सेवा करणारे श्रीवर्धन मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच आजी माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य यांचा सन्मानचिन्ह व शाल देवून सत्कार करण्यात आला.
केंद्र व राज्य सरकारावर विकासकामांबाबत साधला निशाना
तटकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारावर निशाना साधत शेतकरी व आम जनतेला सरकार अंधारात ठेवत आहे. आम्ही राजकारणात शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जपत सत्ता असो वा नसो पक्षाच्या मध्यमातुन जनतेचा सर्वांगीण विकास करीत आहोत आणि भविष्यात करीत राहणार असे सांगताना केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दत्तक घेतलेल्या दिवेआगर गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचायत समिती सदस्यांनी जेवढी विकास कामे केली आहेत त्याच्या एक टक्का तरी काम स्वतः केंद्रीयमंत्री व खासदार असलेल्या अनंत गीते यांनी केले आहे का असा सवालही या वेळी तटकरे यांनीकेला.