मुंबई । मुंबईच्या मुंबईच्या फास्ट लाईफमुळे मुंबईतर नैराश्याने ग्रासले आहेत. त्यातून अधिकाधिक मुंबईकर मधुमेहाचे शिकार होत आहेत, असल्याचे गाडगे डायबेटिस सेंटरच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. चारपैकी एका मधुमेहाने पीडित रुग्ण नैराश्याने ग्रासला असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. विशेषत: महिला आणि तरुणी यांच्यामध्ये हे प्रमाण अधिक आहे. पुरुषांमध्ये 60 वर्षांवरील व्यक्तींना नैराश्यावर उपचार घ्यावे लागत आहेत.
28 टक्के रुग्न नैराशाच्या गर्तेत
गाडगे डायबेटिस सेंटरच्या वतीने जानेवारी 2017 ते मार्च 2017 या कालावधीत मधुमेह रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार 28.5 टक्के रुग्ण हे नैराश्याने ग्रस्त असल्याचे आढळून आले. मधुमेह ही आपल्या मुंबईसह संपूर्ण देशात फोफावत असलेली गंभीर समस्या बनली आहे. इंटनरॅनशनल डायबेटिस फेडरनेशनच्या आकडेवारीनुसार 2015 साली भारतात 69.1 दशलक्ष मधुमेही होते.
कुटुंबियांची वाढती जबाबदारी
केवळ औषधोपचार करून नैराशावर मात करता येणार नाही, एखाद्या व्यक्तीला नैराशातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबीय आणि समाजाची महत्त्वाची भूमिका असते. आपल्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि त्यांना नैराश्य येणार नाही, याची काळजी घेणे हे सर्वांसाठी आवश्यक असते. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांबाबत ही काळजी अधिक घेण्याची आवश्यकता असते, असे डॉ. गाडगे यांनी सांगितले.
बदलती जीवनशैली ठरतेय मारक
बदलती जीवनशैली, लक्ष्य साध्य करण्याचा व्यावसायिक तणाव, कामाच्या ठिकाणी घालविण्यात येणारा अधिक कालावधी, अति महत्त्वाकांक्षा, कुटुंबाकडून वाढलेल्या अपेक्षा या कारणांमुळे तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. काही महिला नोकरीच्या आणि घरच्या कामाच्या व्यापात इतक्या व्यस्त होतात की त्यांना खासगी आयुष्य उरत नाही. ज्येष्ठ नागरिकांना वाढते वय, एकटेपणा, वाढते आजार आणि त्यांचा खर्च यांच्याशी जुळवून घेणे कठीण होऊन बसते. तरुण मधुमेहींची सोशल मीडियाशी असलेली अति-जवळीक आणि उपकरणांना चिकटून असल्यामुळे त्यांचा स्वभाव चिंताग्रस्त बनतो, असे गाडगे डायबेटिस सेंटरचे मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे म्हणाले.