मुंबईच्या अय्यरला पाचारण

0

धर्मशाळा । भारत व ऑस्ट्रेलिया याच्या सामने नेहमी रंगतात मात्र यावेळी या क्रिकेट सामन्यापेक्षा शाब्दीक वादामुळे जास्त रंगले आहे. यात तर ऑस्ट्रेलियांच्या पदाधिकार्‍यांनी उडी घेतली आहे.त्यामुळे चौथ्या कसोटीकडे संगळ्या क्रिकेटपटूचे लक्ष्य लागले आहे.या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरीत आहे.त्यामुळेे धरमशाला कसोटी जिंकणे दोघांसाठी क्रमप्राप्त आहे. पण यंदाच्या मोसमात सूर गवसलेला विराट खांद्याच्या दुखापतीतून अद्यापही पूर्णपणे सावरलेला नाही. कोहली कसोटीच्या तयारीसाठी आयोजित सराव सत्रात सहभागी झाला, पण त्याने फलंदाजी केली नाही. विराटच्या तंदुरुस्तीविषयी साशंकता असल्याने मुंबईकर श्रेयस अय्यरला पाचारण करण्यात आले आहे. त्याच वेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर देणारा कोहली संघात नसणे भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे. कोहली खेळू न शकल्यास उपकर्णधार अजिंक्य राहणकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात येऊ शकते.भारतीय कर्णधार विराट कोहलीने गुरूवारी नेट प्रॅक्टिस केली नाही.कारण त्याला त्याच्या जखमी खांद्याला आराम द्यायचा होता.मात्र शुक्रवारी कोहली मैदानावर अभ्यास करतांना दिसला.

अय्यर कोण ?: मुंबई कडून खेळणारा 22 वर्षीय ÷श्रेयस अय्यर ने ऑस्ट्रेलियाच्या विरूध्द अभ्यास सामना खेळतांना द्विशतक काढले होते. त्याने मागील अनेक सामन्यामध्ये अद्वितीय फलंदाजी केली आहे.यामुळेच त्याला देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया ब्लू संघात स्थान मिळाले आहे.स्वत:कर्णधार विराट कोहलीने श्रेयसचे नाव सुचविले आहे.आणि तो त्याच्या खेळापासून खुप प्रभावित आहे.श्रेयसला मुंबईवरून बोलविण्यात आल्याने संशयाची स्थिती बनली आहे की, खांद्याला लागल्यामुळे कोहली धरमाशाला येथील कसोटी सामना खेळू शकणार नाही त्यामुळेच श्रेयस कोहलीची जागा घेवू शकतो.श्रेयस अय्यर शुक्रवारी सकाळी धरमशाला येथे पोहचला मात्र अभ्यास सत्र तो सहभागी होवू शकला नाही. अभ्यास सत्र सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. 11 खेळाडूत सहभागी होण्यासाठी त्यानां सकाळचे सत्र होण्यापुर्वी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.

तंदुरुस्ती चाचणीवर अवलंबून
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन संघावर ‘डीआरएस’च्या मुद्दयावरून जोरदार टीकास्त्र सोडले होते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने स्वत:ची चूक मान्य केली होती. मात्र संघाबाबतच्या आरोपांचे खंडन केले होते. विराटच्या खांद्याला झालेल्या दुखापतीची ग्लेन मॅक्सवेलने खिल्ली उडवली होती. कर्णधार स्टीव्हन स्मिथवरही हाच आरोप झाला होता. मात्र टेलिव्हिजन पुनप्रेक्षपणात तो आरोप चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी कोहलीवर जागतिक क्रीडा क्षेत्रातील ट्रम्प अशी बोचरी टीका केली होती. धरमशाला कसोटीत ही खडाजंगी आणखी तीव्र होण्याची चिन्हे होती. मात्र दुखापतीने हैराण कोहलीच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. सामन्याच्या दिवशी सकाळी कोहलीची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येईल. त्या निर्णयावर त्याचा समावेश अवलंबून असेल.

55 चा स्ट्राईक रेट
2015 मध्ये श्रेयस अय्यरला आईपीएलच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाने 2.6 कोटीत खरेदी केले होते.अय्यरने आतापर्यंत 38 प्रथम श्रेणीचे सामने खेळला आहे. घरच्या मैदानावर त्याचे प्रदर्शन चांगले असून त्याने 38 सामन्यात 55 च्या स्टाईक रेटने 9 शतकांसह 3366 धावा केल्या आहे. श्रेयसने आतापर्यंत 41 टी-20 सामने खेळला असून त्यामध्ये 125 च्या स्टाईक रेटने 7 अर्धशतके बरोबर 951 धावा केल्या आहे.