मुंबई । मुंबईतील पायाभूत प्रकल्पांचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘कोस्टल रोड’च्या कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. समितीची संमती मिळताच एप्रिलमध्ये कार्यादेश जारी करण्यात येतील आाणि येत्या मे महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. ‘बीकेसी’मध्ये सध्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हे औद्योगिक, पायाभूत सुविधा, संरक्षण, वस्त्रोद्योगसंबंधी भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय, स्थानिक गुंतवणूकदारांनी भेट देऊन कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकारसोबत केली आहे. मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी ‘कोस्टल रोड’ या प्रकल्पासंबंधी माहिती देणारे प्रदर्शन आयोजिण्यात आले आहे.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रेक्षकांची विशेषत: युवांची कमालीची गर्दी उसळलेली असते. पालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचार्यांचे व ‘कोस्टल रोड’ची भव्य प्रतिकृती साकारणार्या ’भगिरथ मॉडेल’चे अनिल सगर आणि राम सगर यांचे त्यांनी उत्स्फूर्त अभिनंदन केले. महापालिकेच्या या दालनाला मुंबईकरांनी, कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांनी विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थी, युवा पिढीने चांगला प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत रोज किमान अडीच ते तीन हजार जण हे प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. हे दालन मुंबईत सुरू असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांसंबंधी माहिती देणारे ’गेट वे’आहे, पण मुंबईकरांनी ’कोस्टल रोड’ची प्रतिकृती पाहण्यासाठी रोज प्रचंड गर्दी केली आहे.
पहिला टप्पा 9 किलोमीटरपर्यंतचा
या प्रकल्पाकडे परकीय गुंतवणूकदारांनी आकर्षित व्हावे, या हेतूने हे दालन उभारलेले नाही. कारण आर्थिक बाबींसंबंधी निविदा प्रक्रिया सुरू आहे. ’कोस्टल रोड’विषयी सर्वमुखी माहिती असावी, हा उद्देश सफल झाला आहे,’ असे मुखर्जी यांनी या प्रतिनिधीला सांगितले. कोस्टल रोडचा पहिला टप्पा 9.8 कि.मी. लांबीचा असेल, त्यात गिरगाव चौपाटी ते पेडर रोडपर्यंत समुद्रखालून असणार आहे. कोस्टल रोड दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा मरिन ड्राइव्ह ते वरळी-बांद्रा सी लिंकपर्यंत असेल. तो पूर्ण करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची असणार आहे, तर ’बांद्रा सी लिंक ते वर्सोवा’ पर्यंतच्या दुसर्या टप्प्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार आहे..