गोलवाड्यातील बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

0

निंभोरा- गोलवाडा, ता.रावेर येथील रहिवासी व बारावीत शिक्षण घेत असलेल्या तरुण विद्यार्थ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. यश होमराज महाजन (17) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. चिनावल येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेला यश हा 2 रोजी गावी गोलवाडा येथे आला होता. मात्र दुपारी तो आपल्या शेतात गेल्यानंतर चार वाजेच्या सुमारास त्यांनी शेतातील विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविली. सायंकाळी उशिरा पाण्यावर बुट तरंगत असल्याने तो यशच्या आजोबांचा असल्याचे व यशने तो पायात घातल्याचे उघडकीस आल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. रावेर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर शोकाकुल वातावरणात गोलवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. निंभोरा पोलीस ठाण्यात हरीभाऊ महाजन यांनी खबर दिली. तपास सहाय्यक निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अरुण कुमावत व ईश्वर चव्हाण करीत आहेत. दरम्यान, विद्यार्थ्याने नेमकी आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही.