मुंबईच्या सुरक्षेसाठी नवी उपाययोजना

0

मुंबई – जीएसटीमुळे एलबीटीसोबतच जकात बंद झाल्यास मुंबईच्या प्रवेशद्वार होत असलेल्या वाहनांची तपासणीही थांबवली जाईल, परिणाम मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. सरकार मुंबईच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणार आहे, सुरक्षेबाबत नव्या उपाययोजना आखण्यात येतील, असे आश्‍वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जीएसटीच्या मंजुरीसाठी आयोजित तीन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी यावर बोलताना मुंबईच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले. जकात बंद झाल्यास गाड्यांची तपासणी होणार नाही. त्यामुळे सरसकट सर्व गाड्या मुंबईत येतील. परिणामी, सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होईल, अशी भीती प्रभू यांनी व्यक्त केली. त्यावर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी उपरोक्त आश्‍वासन दिले.