मुंबई – मुंबईतील चेंबूरमधील अमर महल सिग्नलजवळचा उड्डाणपूल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. पुलाचा सांधा निखळल्यामुळे हा पूल दुरुस्तीसाठी हा पूल आता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे.
मात्र हा पूल दुरुस्तीसाठी बंद केल्यापासून चेंबूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडीला सुरुवात झाली आहे. पूल धोकादायक स्थितीत असल्याने त्याची दुरुस्ती गरजेची बनली. दुरुस्तीचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिसांना मागील आठवड्याच्या शुक्रवारी पुलाचे दोन सांधे निघाल्याचे दिसले. त्यानंतर उत्तरेच्या दिशेने जाणार्या जड वाहनांची वाहतूक पुलावरुन बंद करण्यात आली. पण शनिवारी सार्वजनिक विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी केल्यानंतर पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा रस्ता मुंबईला ठाणे आणि नाशिकशी जोडतो. शिवाय पूर्व द्रूतगती महामार्गावरील महत्त्वाचा पूल मानला जातो. आता जड वाहनांना पुलावर प्रवेशबंदी असून त्यांना खालचा रस्ता वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत नव्याने बांधण्यात आलेले उड्डाणपूूल लोखंडी सांध्यांच्या माध्यमातून जोडण्यात आलेले आहे. असे असले तरी हा साधे निखळण्याचे प्रकार आता दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मुंबई पोलिसांनी या संदर्भात तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे साहजिकच या उड्डाणमुलांच्या बांधकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो.