मुंबईतील दरोडेखोरांची कारागृहात रवानगी : मुंबई क्राईम ब्रँच घेणार ताबा

0

भुसावळ- भुसावळात सराफा बाजारात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघा कुविख्यात दरोडेखोरांना बाजारपेठ पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपींना न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी जळगाव कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने ट्रान्सपर वॉरंटद्वारे आरोपींचा ताबा देण्याची मागणी न्यायालयात केली असता न्यायालयाने प्रोड्युस वॉरंट आणण्यास सांगितल्याने आता मुंबईचे पथक हे वॉरंट आणून आरोपींचा ताबा घेणार आहे. रविवारी रात्री बाजारपेठ पोलिस ठाण्यांचे पोलिस कर्मचारी खडका चौफुलीवर गस्तीवर असतांना पहाटे तीन वाजता वरणगावकडून कार आली (एम.एच.01 एम.ए.8138) मधील मोहीद्दीन शेख निजामुद्दीन शेख (40, रा.काझी वाडा, पाईप लाईन साकी नाका, मुंबई), शाकीर हैदर शेख (40, रा.मुंबरा देवी रोड, मुंबई), अफलोज इस्लाम शेख (23, रा.नालासोपारा, धानु बाग, मुंबई), हुसेन मोहंम्मद रफीक शेख (28, रा.अंधेरी, रमाबाई चाळ रु.नं.65 अंधेरी, मुंबई) या दरोडेखोरांना अटक केली होती.