मुंबईतील मेगाब्लॉकमुळे चार रेल्वे गाड्या झाल्या रद्द

0

भुसावळ। मुंबई विभागात रविवारी घेण्यात येणार्‍या मेगाब्लॉकमुळे 20 रोजी मनमाड ते मुंबई दरम्यान धावणार्‍या अप व डाऊन मार्गावरील चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अप-डाऊन सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंत धावण्यात येणार असल्याची व चार गाड्यांच्या वेळेत बदल झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

12110 व 12109 मनमाड-मुंबई व मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, 12118 व 12117 मनमाड-एलटीटी व एलटीटी-मनमाड गोदावरी एक्सस्प्रेस रद्द करण्यात आली आहे. 12140 नागपूर-मुंबई तसेच 12139 मुंंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक रोडपर्यंतच धावणार आहे. 20 रोजी 12869 मुंबई-हावडा 11.50 वाजता, 11055 एलटीटी-गोरखपूर 12 वाजता, 12542 एलटीटी-गोरखपूर 12.15 वाजता, 11061 एलटीटी-दरभंगा 12.25 वाजता सुटणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.