मुंबईतील शिक्षकांवरील अन्याय दूर करा

0

मुंबई : शिक्षकांचा पगार राष्ट्रीयकृत बँकेत करणे, रात्र शाळेतील शिक्षक टिकला पाहिजे, कला व क्रीडा विषयाच्या शिक्षकांना तासिका मिळाव्या, मराठी माध्यमातील शाळा टिकल्या पाहिजेत यासह शिक्षकांच्या अन्य मागण्या मान्य झाल्या पाहिजेत यासाठी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे, आमदार सुनिल शिंदे, आमदार बालाजी किणीकर यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर आमदारांनी घोषणाबाजी केली.

राज्य सरकारने मुंबई बँकेतून शिक्षकांचा पगार करण्यासाठी मुंबई बँकेत खाते उघडण्याचे आदेश शिक्षकांना दिले आहेत. यामुळे मुंबई बँकेतून पगार करण्यात येवून नये म्हणून शिवसेनेच्या आमदारांनी या निर्णयाला विरोध केला. विधानभवनाच्या पायऱ्यावर यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाही या आमदारांनी दिल्या. यावेळी शिक्षकांवर अन्याय करण्याऱ्या सरकारचा धिक्कार असो, मुंबई बँकेची दादागिरी नहीं चलेगी, शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असो, शिक्षकांचा पगार राष्ट्रीयकृत बँकेत झालाच पाहिजे अशा घोषणा या आमदारांनी दिल्या.