ताज हॉटेल समोरील हॉटेलला आग; पथकाकडून बचावकार्य सुरु !

0

मुंबई: प्रसिद्ध ताजमहाल हॉटेलजवळील चर्चिल चेंबर या चार मजली इमारतीतील चौथ्या मजल्याला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत अनेक रहिवाश्यांची सुखरूप सुटका केली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. या इमारतीमधून ६ ते ७ जणांची सुटका करण्यात आली असून आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी 12.25 बाराच्या सुमाराला मेरी वेदर रोडवरील या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. या मजल्यावर असलेल्या अनेक वयस्क रहिवाशी अडकले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली.