मुंबई : मुंबईतील कचर्याच्या विल्हेवाटीसाठी मुंबई महापालिकेच्यावतीने योग्यप्रकारे नियोजन केले जात असून यामुळे दैनंदिन कचरा निर्माण होण्याच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षांपर्यंत दररोज सरासरी 9 हजार मेट्रीक टन कचरा उचलला जात होता. परंतु सध्या दैनंदिन कचरा सरासरी 7 हजार 900 मेट्रीक टन एवढा निर्माण होत आहे. त्यामुळे दैनंदिन कचर्याच्या प्रमाणात सरासरी 1100 मेट्रीक टनांची घट झाला असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मुंबईतील कचर्याचे संकलन व वर्गीकरण तसेच विल्हेवाटीसाठी महापालिकेच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली खाते प्रमुख, उपायुक्त, सहायक आयुक्त यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून कचर्याबाबतची माहिती देण्यात आली.
कचरा वर्गीकरण केंद्रामुळे बदल
चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्यावतीने 12 ठिकाणी कचरा वर्गीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. विकास नियोजन आराखड्यात हे राखीव असलेले 12 भूखंड महापालिकेच्या ताब्यात आले असून यावर कचरा वर्गीकरण केंद्रे उभारली जाणार आहेत. या 12 वर्गीकरण केंद्रांमुळे व सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या 38 कचरा वर्गीकरण केंद्र आणि नव्याने सुरू होणार्या 12 केंद्रामुळे एकूण 50 कचरा वर्गीकरण केंद्र बनले जातील. यामुळे दररोजच्या कचर्यात 600 मेट्रीक टन कचर्याची घट होईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आलासिंधुदुर्ग, कुडाळ या ठिकाणी या गाड्यांना थांबा दिला आहे. या गाडीत एक एसी टू टायर, तीन एसी थ्री टायर, तेरा टू टायर आणि सहा जनरल डबे आहेत. या गाडीचे आरक्षण 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.