मुंबई । परवडणार्या घरांच्या क्षेत्रात आघाडीचा पुरवठादार असलेल्या एक्सर्बियाने चेंबूर, मुंबई आणि बालेवाडी, पुणे येथे दोन नवीन प्रकल्पांची गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरवात करण्याची घोषणा केली आहे. हे दोन प्रकल्प एक्सर्बियाच्या शहरात सिटी सेंटर रणनीती अंतर्गत पहिली लोकेशन्स आहेत ज्याद्वारे कंपनी मध्यवर्ती ठिकाणी विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असेल. सिटी सेन्टर मध्ये एक्सर्बियाच्या आगमनाने महागड्या रियल इस्टेट बाजारात किमती रास्त होऊ शकतील. एक्सर्बिया चेंबूर प्रकल्पात 1 बेडरूम अपार्टमेंट रु. 40 लाख तर एक्सर्बिया बालेवाडीमध्ये 1 बेडरूम अपार्टमेंट रु.15 लाखाला असेल. या बरोबरच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र ग्राहकांना रु. 2.5 लाख एवढी सबसिडी ही मिळू शकेल. मुख्य म्हणजे या प्रकल्पांची रचना हाफिज काँट्रॅक्टर यांनी केली आहे.
एक्सर्बियाने केला भावी पिढीचा विचार
युवा व्यावसायिकांना समोर ठेवताना एक्सर्बियाने रास्त किंमत आणि उपलब्धता या पुढच्या पिढीतील भावी घर मालकांच्या मागणीला प्रतिसाद दिला आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि त्याचबरोबर सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड, मेट्रो आणि मोनोरेल यांना लगत असल्याने हा प्रकल्प कोणत्याही कार्यालयीन ठिकाणाच्या अगदी जवळ आहे. त्या बरोबरच विमानतळ आणि पुण्याकडे जाणारा महामार्ग ही जवळपास आहेत. एक्सर्बिया बालेवाडी पुण्याच्या आयटी क्षेत्रातील युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या चैतन्यमय भागात स्थित असतानाच हिंजेवाडी आयटी पार्कच्या जवळ आहे. या आयटी हबमध्ये अंदाजे 2 लाख नागरीक इन्फोसिस, टिसीएस, केपीआयटी क्युमिंस इन्फोसिस्टम आणि इतर कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.