मुंबईत कार-ट्रकचा भीषण अपघात, 9 जण गंभीर

0

मुंबई : मुंबईत मध्यरात्री दादर-माटुंगा फ्लायओव्हरवर स्कॉर्पिओ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. या अपघाताचे नेमके कारण कळू शकलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती आहे. शनिवारी मध्यरात्री दादर-माटुंगा उड्डाणपुलावर कार आणि ट्रकची जोरदार टक्कर झाली. या अपघातात कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.