मुंबई : घाटकोपरमधील सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जीबीन सनी असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नाही.
इतर विद्यार्थ्यांबरोबर आज दुपारी जीबीन सनीही मैदानावर खेळायला आला होता. यावेळी रस्सीखेच खेळत असताना तो अचानक कोसळला. त्यामुळे त्याला तातडीने बाजूलाच असलेल्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे.