मुंबईत ‘नाइट लाइफ’ला परवानगी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब !

0

मुंबई: मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याच्या निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. त्याला अखेर राज्य मंत्रिमंडळाने आज बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. येत्या २७ जानेवारीच्या रात्रीपासून या निर्णयाची अंमलबजाणवी होणार आहे. नाइट लाइफमुळं मुंबईत रोजगार वाढेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. या निर्णयावर टीका देखील होत आहे. ‘नाइट लाइफ’मुळे गुन्हेगारीत वाढ होईल, महिलांवरील अत्याचारात वाढ होईल अशी टीका होत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख व आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निर्णयाची माहिती दिली.