मुंबईत पाऊस : आज अप-डाऊन हुतात्मासह चार एक्स्प्रेस रद्द

0

प्रवाशांची प्रचंड गैरसोय ः मंगळवारीदेखील 12 गाड्या रद्द

भुसावळ- मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून गुरुवारीदेखील चार एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून त्यात अप-डाऊन हुतात्मा एक्स्प्रेसचाही समावेश आहे तर बुधवारी अप-डाऊन मार्गावरील तब्बल 12 एक्स्प्रेससह सकाळची अप मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

बुधवारी तब्बल 12 एक्स्प्रेस रद्द
बुधवारी भुसावळ विभागातून जाणार्‍या तब्बल अप मार्गावरील चार तर डाऊन मार्गावरील आठ अशा एकूण 12 एक्स्प्रेससह अन्य अप 51154 मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. रद्द गाड्यांमध्ये अप 12142 पाटलीपूत्र-लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्स्प्रेस, अप 11062 दरभंगा-लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्स्प्रेस, अप 12533 लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस, अप 22866 पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्स्प्रेस तर
डाऊन 11067 लोकमान्य टिळक टर्मिनल्स फैजाबाद एक्स्प्रेस, डाऊन 15017 लोकमान्य टिळक टर्मिनल्स गोरखपूर-काशी एक्स्प्रेस, डाऊन 12167 डाउन-लोकमान्य टिळक टर्मिनल्स वाराणसी एक्स्प्रेस, डाऊन 22221 मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस, डाऊन 12147 कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस, डाऊन 11055 लोकमान्य टिळक टर्मिनल्स गोरखपूर-गोदान एक्सप्रेस, डाऊन 12879 लोकमान्य टिळक टर्मिनल्स भुवनेश्वर एक्स्प्रेस, डाऊन 11057 मुंबई-अमृतसर एक्स्प्रेसचा समावेश आहे.

आज हुतात्मासह चार एक्स्प्रेस रद्द
गुरूवारीदेखील सलग पाचव्या दिवशी पाच एक्स्प्रेस प्रारंभिक स्थानकापासून रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द गाड्यांमध्ये अप 11025 भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, अप 12148 निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेस, डाऊन 11026 पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस, डाऊन 22865 लोकमान्य टिळक-पुरी टर्मिनल्स एक्स्प्रेस रद्द करण्यात आली.