मुंबई : मुंबईत स्वाईन फ्लूच्या साथीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिका-याचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असणार्या दिलीप शिंदे यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. ते वाहतूक विभागात कार्यरत होते.
दिलीप शिंदे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने पोलीस दलातील त्यांच्या सहकार्याना धक्का बसला आहे. स्वाईन फ्लू झाल्यामुळे त्यांना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शिंदे हे मूळचे सोलापूरचे होते. 1987साली ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते पोलीस दलात रुजू झाले होते. सांताक्रूझ, माहीम आणि धारावी पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी काम केले होते.