मुंबईत ‘मराठा क्रांती’चा 9 ऑगस्ट रोजी महामोर्चा

0

चोपडा। चोपडा येथे येथे मुंबईतील 9 ऑगस्ट क्रांतिदिनी निघणार्‍या मराठा क्रांति मोर्चाच्या नियोजनासाठी सार्वजनिक विश्राम गृहात तालुक्यातील समाज बांधवांची बैठक झाली. त्यावेळी जिल्हा समन्वयक प्रा.डी.डी.बच्छाव यानी मार्गदर्शन केले. जळगाव येथील मोर्चात दाखवलेली शिस्त पाळावी, मराठा समाज समाजातील इतर घटकांसोबत मोठे भावाची भूमिका निभावतो त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी, मागील मोर्चा निघाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत मुंबईत अभिजीत पवार व नाशिक विभागातील प्रतिनिधिनिंची भेट घेतली असता त्यात जिल्ह्यातील प्रश्न त्यात प्रामुख्याने तरुणांना रोजगार मिळावेसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविने व त्यांच्यासोबत महिलांच्या बचतगटांना देखील वेगवेगळे प्रशिक्षण त्यात प्रामुख्याने शिवनकाम व गावात रोजगार मिळेल असे प्रशिक्षण देणे व कमी व्याजदर असलेले कर्ज उपलब्ध करून देणे, शेतकर्‍यांना कर्जमाफी, शेतमालास हमी भाव व सन्मान जनक वागणूक मिळावी असे प्रस्ताव ठेवले, परंतु शासनाने लाखोंचे मोर्चे निघुन देखील मराठासमाजाचे व शेतकर्‍यांचे प्रश्न बेदखल केलेत म्हणून आता महामोर्चा असे सांगितले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा समन्वयक विलास पाटिल, प्रा.सुनिल गरूड, विनोद देशमुख, राजेश पाटील, प्रवीण देशमुख, दिपक पाटील, अजित पाटील यांनी समाज बांधवांसोबत चर्चा करून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संजीव सोनवणे यांनी तर आभार एस.बी. पाटील यांनी मानले. यावेळी तालुक्यातील धनंजय पाटील, देवेंद्र सोनवणे, रमेश सोनवणे, नंदू देशमुख, प्रमोद बोरसे, प्रा.संदीप पाटील, एकनाथ पाटील, प्रा.शैलेश वाघ, महेंद्र बोरसे, सतीश बोरसे, उदय पाटील, राजेंद्र पाटील, पांडुरंग सोनवणे, रविंद्र पाटील, दिव्यांक सावंत, अ‍ॅड. सोनू पाटील, प्रदीप पाटील, मनोज सनेर, पप्पूदादा पाटील, समाधान पाटील, जगदीश पाटील, एस.एस.बाविस्कर, दिनेश बाविस्कर, मंदार बाविस्कर, राजेंद्र पवार, डॉ.रोहन पाटील, किशोर पाटील, सुदर्शन पाटील, पाटील, डॉ.जया पाटील आदि उपस्थित होते.