मुंबई । महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे 2 ते 5 जानेवारी दरम्यान 44 व्या सब ज्युनियर आंतरराज्य कॅरम अजिंक्यपद आणि 24 व्या ऑल इंडिया फेडरेशन कप कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा हलारी व्हिसा ओसवाल समाज हॉल, दादर (प.). या दोनही स्पर्धासाठी एलआयसी प्रायोजक असून स्पर्धेला क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाची मान्यता आहे.
या स्पर्धेत 22 राज्यातून अनेक खेळाडू आपला सहभाग नोंदवणार असून कॅडेट (12 वर्षाखालील) मुले आणि मुली, सबज्युनियर (14 वर्षाखालील)मुले आणि मुली गटात चुरस पहायला मिळेल.चार दिवसांच्या मुख्य स्पर्धेचे आकर्षण फेडरेशन कपसाठी पाच वर्ल्ड चॅम्पियन्स आणि 40 भारतीय स्टार खेळाडू एकमेकांना आव्हान देणार आहे. 23 राज्य व 12 संस्थामधील खेळाडू सहभाग नोंदवतील.कॅरम चाहत्यांना चुरशीचे सामने पाहण्याची संधी आहे. या स्पर्धेसाठी कॅडेट गटात एकेरीचे सामने होतील. आणि थेट बाद फेरी होईल. तर सब ज्युनियर मध्ये सांघिक अजिंक्यपद स्पर्धा साखळी आणि बाद पध्दतीने खेळविण्यात येईल.तसेच एकेरीच्या स्पर्धा देखील होतील.फेडरेशन कप स्पर्धेत पुरुष व महिला एकेरीचे सामने आणि दुहेरीचे बाद पध्दतीने खेळविण्यात येतील. सर्व सामने सारको कॅरम बॉर्डवर होतील. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडून आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन आणि अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी बी. बंगारु बाबू यांचा सत्कार करण्यात येणार आहे.बाबू यांना स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी 1,11,111 रुपये देऊन गौरविण्यात येईल.स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक देण्यात येणार आहे.