मुंबईत राहत्या घरात मोठा शस्त्रसाठा…

0

एके 56, 95 काडतुसे, 2 पिस्तूल आणि 3 मॅगझीन जप्त

मुंबई । गोरेगाव येथील एका घरात मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. पोलिसांनी एके 56, 95 काडतुसे, 2 पिस्तूल आणि 3 मॅगझीन जप्त केल्या आहेत. एका महिलेस या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी रात्री ही करवाई केली.

यास्मिन असे आरोपी महिलेचे नाव असून अंडरवर्ल्डशी तिचा संबंध असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सदस्य नईम याची ती पत्नी असल्याचे समजते. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.