मुंबईत सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी लढा

0

पुणे : भारतीय जनता पक्ष आणिी शिवसेनेची भूमिका एकच असून, पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आमचे आणि सेनेचे राजकारण आहे. मुंबईच्या महापौरपदावर चर्चा होत राहील. पण आम्ही सरकारमध्ये सत्तेसाठी किंवा पदासाठी नाही, तर सत्यासाठी आहोत, अशी भूमिका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी शुक्रवारी यंते मांडली.

जिल्हा वार्षिक योजनेच्या पुणे विभागीय प्ररूप आराखडा बैठकीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात मुनगंटीवार आले होते. या बैठकीनंतर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट व खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, शिवसेनेच्या मंत्र्याच्या पारदर्शकतेच्या सूचना आम्हाला मान्य आहेत. आमची लढाई महापौरपदाच्या खुर्चीसाठी कधीही नव्हती. फक्त पारदर्शकतेसाठी होती. सरकारी विभाग, निविदा प्रक्रिया, तसेच मंत्रिमंडळातील पारदर्शकतेसाठी यापुढे अभ्यासपूर्ण निर्णय घेण्यात येतील. त्यासाठी घटनेेच्या चौकटीत राहून काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. पारदर्शक कारभारासाठी नागरिकांनीही संकल्पना आणि सूचना पाठवाव्यात. त्यांचाही विचार करण्यात येईल.

शिवसेना अणि भाजप हे केवळ विश्‍वस्त आहेत. नागरिकांना चांगल्या सोयी देण्यासाठी आम्ही काम करणार आहेत. शिवसेना आणि भाजपचे राजकारण सत्तेेसाठी नसून, मुद्यांवरचे आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.