मुंबईत स्वाईन फ्लूचे आणखी 3 बळी

0

मुंबई । राज्यात स्वाईन फ्लूनने थैमान घातलं असताना मुंबईत स्वाईन फ्लूचा तिसरा बळी गेला आहे. भांडुपच्या टिळकनगर परिसरात राहणार्‍या तीस वर्षीय गर्भवतीचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मूळची अलाहाबादची असणारी ही महिला महिन्याभरापूर्वीच भांडुप इथे राहण्यास आली होती. ही महिला सात महिन्यांची गर्भवती होती. याआधी वरळीतील दीड वर्षीय मुलगा आणि कुर्ल्यातील 72 वर्षीय महिलेचाही स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. मुंबईत स्वाईन फ्लूचे 37 रुग्ण आढळलेत. तर राज्यात स्वाईन फ्लूची लागण झालेले हजारहून अधिक रुग्ण आढलेत. तर राज्यात स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या दोनशे दहा इतकी झाली आहे.

मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण
सुमारे दोन हजार 26 लोकांची स्ववाईन फ्लूची तपासणी करण्यात आली आहे मुंबईत या आजाराने डोके वर काढल्याने पालिका आरोग्य विभागाचे धाबे चांगलेच दणाणले असून धावपळ सुरू झाली आहे. आता पुन्हा मुंबईत थैमान घालण्यास सुरुवात केली आहे या खतरनाक आजाराने शिरकाव केल्याने पालिकेचे धाबे चांगलेच दणाणले असून मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईत 37 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले
महिला राहत असलेल्या परिसरात 11 जणांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आले आहे. राज्यात जानेवारी महिन्यांपासून 210 जणांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे. त्यापैकी 5 रुग्ण राज्याबाहेरुन उपचारांसाठी आलेल्या रुग्णांचे मृत्यू आहेत. दोन रुग्ण मध्य प्रदेशातील तर, दोन कर्नाटकातील असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकार्‍याने सांगितले आहे. राज्यात 1058 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले असून त्यापैकी 565 जणांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहेत. राज्यात 8 जण कृत्रिम श्‍वासोच्छवासावर आहेत. तर मुंबईत जानेवारी ते 17 मे पर्यंत 37 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत साडे चार महिन्याच्या बाळाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता, तो मुंबईतला पहिला बळी होता.

या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेने भांडुप टिळकनगर परिसरातील 525 घरांतील 2 हजार 26 व्यक्तिंची चाचणी करण्यात आली आहे पालिकेने या आजाराची चांगलीच दखल घेतली असून पालिकेच्या 24 विभागात उपाययोजना सुरू केल्या आहेत ज्या ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत त्या त्या भागात जास्त लक्ष दिले जात आहे पालिकेच्या रुग्णालयात या आजारासाठी सोय करण्यात आली आहे पालिका सवॅ परीने प्रयत्न करत असून हा आजार लवकरच आटोक्यात येईल मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे तसेच औषधे व लस उपलब्ध असून जशी औषधे व लस कमी पडत असतील त्याप्रमाणे मागणी करण्यात येत आहे अशी माहिती पालिका आरोग्य अधिकारी डॉ पद्मजा केसकर यांनी दैनिक जनशक्तीशी बोलताना दिली

हवेतून पसरणारा हा आजार
सन 2015 मध्ये मोठ्या प्रमाणात र-वाईन प-लूने शिरकाव केला होता तो आजार पालिका प्रशासनाने वेळीच आटोक्यात आणला होता पण यंदा तेवढा आजार नसून पालिका हा आजार आटोक्यात आणण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू केले आहेत हा आजार हवेतून पसरणारा आजार आहे हवे मध्ये चेंचज होतो त्याप्रमाणे आजार डोकं वर काढत असते मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये पालिका प्रशासन लवकरच हा आजार आटोक्यात आणेल
डॉ पद्मजा केसकर, पालिका आरोग्य अधिकारी