मुंबईत १५० तबलिगींविरोधात गुन्हा दाखल

0

मुंबई – दिल्ली येथील मरकजमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमला उपस्थित राहून देखील माहिती लपवल्याच्या आरोपाखाली १५० व्यक्तींविरोधात मुंबईपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमात मरकजला सभागी झालेल्या १५० व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ त्यांचा शोध घेऊन त्यातील अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले. मात्र, देशात आणि राज्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी सामूहिक कार्यक्रम करण्यास मनाई असतानाही मुंबईतील १५० व्यक्ती या तबलिगीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच त्याची माहिती लपवल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी या १५० व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.