मुंबई : देशात जातीय विष पेरण्याचे काम सरकारकडून काम ठरवून केले जात आहे. निरपराध लोकांच्या क्षुल्लक कारणावरून हत्या केल्या जात आहेत. या सरकारी धोरणाचा विरोध म्हणून मुंबईत 3 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता 38 संघटनांचा विराट मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष खा. प्रकाश आंबेडकर व डाव्या चळवळीतील नेते प्रकाश रेड्डी यांनी मंत्रालयात पत्रपरिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, संविधान नष्ट करण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे. जो विरोध करतो त्याला देशद्रोही म्हटले जातेय. ‘नफरत कर खिलाफ, इंसानियात की आवाज’ या नाऱ्याखाली डाव्या, समाजवादी आणि आंबेडकरवादी चळवळीतील 38 रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती दिली. कोतवाल गार्डन पासून ते चैत्यभूमी पर्यंत हा मोर्चा निघणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश रेड्डी यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी केले.