मुंबईत1996 पासून 19 इमारती कोसळल्या, 307 जणांचा बळी

0

मुंबई । मुंबईत गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी भेंडीबाजार येथील हुसैनी ही सहा मजली इमारत कोसळून 33 निष्पाप लोकांचा नाहक बळी गेला. यात इमारतीमधील 14 रहिवाशी तसेच अग्निशमन दल, एनडीआरएफचे 7 जवान जखमी झाले आहेत. मुंबईत हुसैनी या इमारतीच्या दुर्घटने प्रमाणेच 1996 पासून अद्याप 19 इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. या दुघटनांमध्ये अद्याप 307 जणांचा बळी गेला आहे. 2013 मध्ये 4 इमारतीच्या दुर्घटना घडून 78 बळी गेले होते. तर 1997 मध्ये 3 इमारतीच्या दुर्घटना घडून 39 बळी गेले होते. सन 2005 ते 2017 या कालावधीत 14 विविध इमारत दुर्घटनामध्ये तब्बल 204 जणांचा नाहक बळी गेला आहे.

बेकायदा दुरुस्तीच्या कामांमुळे अपघात
जून 2013 रोजी दहिसर येथील पीयूश ही इमारत दुर्घटना घडून 7 जणांचा, 27 सप्टेंबर 2013 रोजी माझगाव येथील बाबू गेनू ही इमारत दुर्घटना घडून 61 जणांचा बळी गेला आहे. 14 मार्च 2014 रोजी सांताक्रूझ येथील शंकरलोक ही धोकादायक रिकामी इमारत शेजारील चाळीवर कोसळली होती त्यात 7 जणांचा बळी गेला होता. त्याचप्रमाणे 9 मे 2015 रोजी काळबादेवी येथील गोकुळनिवास इमारत आग लागून कोसळली आणि या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या 4 अधिकार्‍यांचा मृत्यू झाला. 25 जुलै 2017 रोजी घाटकोपर येथील सिद्धि साई ही इमारत कोसळली आणि त्यात 17 जणांचा बळी गेला आणि 13 जण जखमी झाले. त्यानंतर पवई चांदीवली येथें धोकादायक कृष्णन बिझनेस पार्क या धोकादायक इमारतीचे पाडकामं सुरू असताना इमारतीचे बांधकाम कोसळले आणि 7 जणांचा बळी गेला.

इमारती बनल्यात धोकादायक
1996 ते 1998 या तीन अवघ्या 3 वर्षात 5 इमारत दुर्घटनामध्ये तब्बल 103 लोकांचा नाहक बळी गेला आहे. 7 मार्च 1996 रोजी एफ/ उत्तर विभागात नवरे अपार्टमेंट इमारत दुर्घटना घडून 29 जणांचा बळी गेला. 17 एप्रिल 1997 रोजी मालड येथील सुखसागर इमारत दुर्घटना घडून 18 जणांचा बळी गेला. त्यानंतर 16 ऑगस्ट 1997 रोजी विलेपार्ले येथे प्रवीण श्रुती इमारत दुर्घटना घडून 2 जणांचा बळी गेला. त्यानंतर 16 सप्टेंबर 1997 रोजी वरळी येथे पुनम चेंबर्स इमारत दुर्घटना घडून 19 जणांचा बळी गेला.