अलिबाग । पालघर जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने पालघर, डहाणू, व जव्हार येथील सहा जनांचा बळी घेतला असून चार मृत देह हाती लागले असून दोघा जणांचे मृतदेह शोधन्याचे काम सुरु आहे, तर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, देहरजा, सुसरी, बाणगंगा, आदि सर्वच नदयाना पुर असून प्रशासनाने नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रविवारी रात्रीपासून पावसामुळे जनजीवन विष्कळीत झाल आहे. अनेक ठिकाणी पुरसदृस्य परिस्थिति निर्माण होऊन काही मृत्यु मुखी पडले आहेत तर काही बेपत्ता आहेत. एकूणच जीवितहानी बरोबर मोठे आर्थिक नुकसानही या पावसामुळे झाल आहे. पालघर डहाणू, बोईसर, जव्हार तालुक्यातील पावसाच्या पाण्याच्या पुरात 6 जण वाहून गेलेल्यांपैकी एक बालिका, एक महिले सह चार मृतदेह हाती लागले असून दोघ जण अजूनही बेपत्ता आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या सूर्या प्रकल्पच्या धरणाचे पाच दरवाजे एक फूटाने उघडण्यात आले असल्याने कवडास धरणातुंन 18700 क्यूसेस तर धामनी धरणतून 6300 क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग सुरु असल्याने सूर्या नदिला गेले तीन दिवस सतत पुर आहे, पावसाचे प्रमाण अधिक वाढल्यास धरणाचे दरवाजे आणखी उघड़ावे लागतील असे कार्यकारी अभियंता दुसाने यानी माहिती देताना सांगितले.
पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशनमध्ये पाणी आले असल्याने, तर काही ठिकाणीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने काही परिसरातील वीज पुरवठा बंद केला आहे. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत गरजेचे आहे. काही परिसरातील जागरूक नागरिकही त्यांच्या स्थानिक परिसराची माहिती देत आहेत, तेथेही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत. पावसाचे पाणी ओसरताच सुरक्षेचा आढवा घेऊन वीज पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. या परीस्थित नागरिकांनी सहकार्य क रावे असे आवाहन महावितरणचे अधिक्षक अभियंता दि, रा, पाटील यांनी केले आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून ते फिल्डवर कार्यरत आहेत. ग्राहकांनी परिस्थितीनुसार वा गरजेनुसार आपल्या नजीकच्या कार्यालयाशी टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधन्याचे आवाहन विज वितरण कंपनीने केले आहे.
छोट्या पुलावर चार फूट पाणी
बोईसर- चिल्हार रस्त्यावर खैरापाड़ा येथे तेथील छोट्या पुलावर तीन ते चार फुट पाणी आल्याने 750 हुन अधिक मांणस सायंकाळपासुन अड़कले होते. या सर्वाना जिल्हा आपातकालीन व्यवस्थापन टीम व बोइसर पोलिसांनी रात्री उशिरा सुखरूप बाहर काढून त्याच्या घरी रवानगी केले, तर बोइसर पुर्वेच्या मान-बेटेगाव जवलील टाटा हाउसिंग कॉलनी जवळ मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. पालघर जिल्ह्यात पावसाने रात्री पासून घेतली विश्रांती घेतली होती मात्र सकाळी पुन्हा पावसाने मदार सुरुवात केली, पालघरचे जिल्हाधिकारीडॉ प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याने कालच्या सारखे विद्यार्थ्याांचे हाल झाले नाहीत. जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या सूर्या प्रकल्पच्या धरणाचे पाच दरवाजे एक फूटाने उघडण्यात आले असल्याने कवडास धरणातुंन 18700 क्यूसेस तर धामनी धरणतून 6300 क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग सुरु असल्याने सूर्या नदिला गेले तीन दिवस सतत पुर आहे.
लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द
पालघर जिल्ह्यात रात्रीच्या चार तासांच्या विश्रांती नंतर बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून पुन्हा पावसाने दमदार सुरुवात केली असल्याने कालच्या सारखीच परिस्थिति निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे, पश्चिम रेल्वे वरिल मुबईकड़े जाणार्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रदद् करण्यात आल्या होत्या. केवळ लोकल ट्रेन व मेमू आणि शटल गाड्या त्यादेखील 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या.