मुंबई : क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने राजस्थान संघासमोर १८८ धावांचे लक्ष ठेवले होते. हे लक्ष जोस बटलर आणि अजिंक्य रहाणेच्या जोरदार फटकेबाजीमुळे राजस्थानने ४ गडी राखत मुंबईवर विजय मिळविला. राजस्थान रॉयल्सने आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला विजयी चौकार मारण्यापासून राजस्थानने रोखले.
शेवटच्या षटकापर्यंत हा सामना खेळला गेला. कृणाल पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी अखेरच्या षटकांत राजस्थानला धक्के देत सामन्यात चुरस निर्माण केली होती. पण, राजस्थानने अखेरच्या षटकात विजय मिळवला.