भुसावळ- उन्हाळ्यामुळे रेल्वे गाड्यांना वाढलेली गर्दी पाहता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-अलाहाबाद दरम्यान विशेष साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांना या गाड्यांमुळे काही अंशी दिलासाही मिळणार आहे.
सीएसटी-अलाहाबाद एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 04116 साप्ताहिक सुपरफास्ट गाडी 7 एप्रिल ते 30 जून दरम्यान दर रविवारी चालवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दुपारी 4.40 वाजता ही गाडी सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 5.25 वाजता अलाहाबाद पोहोचेल तर गाडी क्रमांक 04115 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी 6 एप्रिल ते 29 जुनदरम्यान दर शनिवारी धावणार आहे. अलाहाबाद येथून 3.25 वाजता ही गाडी सुटून दुसर्या दिवशी 3.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, पिपरीया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, शंकरगड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला वातुनूकलित टू टीयर, 10 वातानुकूलित थ्री टीयर, चार स्लीपर तसेच सहा जनरल डबे असणार आहेत. दरम्यान, या गाडीसाठी 4 एप्रिलपासून आरक्षण सुविधा रेल्वेच्या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे.