मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस

0

मुंबई : मुंबई-उपनगरांसह कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती, मात्र शनिवारी सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणपट्ट्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाणे वर्तवली आहे. दरम्यान काल शनिवारी सकाळपासूनच मुंबईत पावसानं जोर धरला आहे. वसई-विरारमध्येही देखील पावसाला सुरुवात झाली आहे.

आजही मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तिकडे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, पेण, उरण भागात काल रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. ठाण्यात झाड कोसळून ४ गाड्यांचं नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. फायरब्रिग्रेडचे अधिकारी झाड हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

भिंत कोसळली
मुंबईच्या जोगेश्वरी भागात काल शनिवारी रात्री १०  वाजण्याच्या सुमारास 2 सोसायटीमधील भिंत पडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. केवळ २ वर्षांपूर्वी बांधलेली ही भिंत होती. दुपारीच या २ सोसायटीमधील लोकांना याचा अंदाज आल्याने त्यांनी भिंतीलगतचा भाग मोकळा करून ठेवला होता. तरीही या घटनेत ६ चारचाकी आणि २ दुचाकींचे नुकसान झाले आहे.