भुसावळ : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरीक्त गर्दी पाहता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर/मालदा टाउन दरम्यान 36 साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अशा आहेत विशेष गाड्या
01033 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर साप्ताहिक विशेष ट्रेनच्या एकूण 18 फेर्या होणार असून ही गाडी 9 एप्रिल ते 4 जून दरम्यान चालवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर शनिवारी रात्री 12.20 वाजता गाडी सुटल्यानंतर त्याच दिवशी दुपारी 3.32 वाजता नागपूरात पोहोचणार आहे. 01034 साप्ताहिक अतिजलद विशेष नागपूर-सीएसटी ट्रेन 10 एप्रिल ते 5 जून दरम्यान चालवण्यात येईल. दर रविवारी 1.30 वाजता नागपूर येथून ही गाडी सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी 4.10 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी बोगी असतील शिवाय ज्यामध्ये गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन असेल.
सीएसटी-मालदा टाऊन
01031 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मालदा टाउन साप्ताहिक गाडीच्या 18 फेर्या होणार आहेत. 01031 साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी 11 एप्रिल ते 6 जूनदरम्यान दर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 11.05 वाजता सुटेल आणि मालदा टाउन येथे तिसर्या दिवशी 12.45 वाजता पोहोचेल तर 01032 साप्ताहिक विशेष मालदा टाऊन-सीएसटी गाडी 13 एप्रिल ते 8 जूनदरम्यान चालवण्यात येणार आहे. ही गाडी दर बुधवारी मालदा टाउन येथून 12.20 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसर्या दिवशी 03.50 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, किउल, अभयपूर , जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज, बडहरवा आणि न्यू फरक्का रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी बोगी असतील. ज्यामध्ये गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅनचा समावेश आहे.