हैदराबाद । अचूक गोलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर रविवारी 10 व्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ’रायझिंग पुणे सुपरजायंटस’ संघाने ’मुंबई इंडियन्स’ना अवघ्या 129 धावांत रोखण्यात यश मिळविले होते. मात्र याला प्रत्युत्तर म्हणून रायझिंग पुणे एका धावेने पराभूत झाला. अजिंक्य राहणे (44), स्टेव्हन स्मिथ (51), राहूल त्रिपाठी (3), महेंद्रसिंग धोनी (10), मनोज तिवारी (7) मात्र शेवटच्या दोन षटकात दोघी सामन्यात अटीतटीच्या खेळात मुंबई इंडियन्सने बाजी मारली.
मुंबई तिसर्यांदा अजिंक्य
जयदेव उनाडकटच्या भेदक मार्यासमोर पार्थिव पटेल (4), लँडल सिमॉन्स (3) हे मुंबई इंडियन्सचे सलामीवीर माघारी परतले तर अॅडम झंम्पाच्या भेदक मार्यासमोर रोहित शर्मा (24), किरॉन पोलार्ड (7) यांचा टिकाव लागला नाही. त्यातच अंबाती रायडू (12), कर्ण शर्मा (1) धावबाद झाले. डाव सुरु झाल्यापासूनच नियमित अंतराने फलंदाज गमाविलेल्या मुंबई इंडियन्सना सावरण्याची संधीच पुण्याच्या संघाने दिली नाही. मुंबईचा डावखुरा शैलीदार फलंदाज कृणाल पंड्या (47 धावा – 38 चेंडू) याची आश्वासक खेळी हेच मुंबईच्या डावाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. हार्दिक पंड्या व केरॉन पोलार्ड या मुंबईच्या आक्रमक फलंदाजांना स्वस्तात माघारी परत धाडत सुपरजायंट्सच्या गोलंदाजांनी मुंबईस अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यास फारसा वाव ठेवला नाही. मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे संघाला 130 धावांचे आव्हान दिले होते मात्र पुण्याला एका धावेमुळे हार मानावी लागली.