मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा गोविंदांना दिलासा

0

मुंबई उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने घातलेले निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पण यांदाही आपल्याला यंदाच्या गोपाळकाल्याला मानवी मनोर्‍यांचा थरार पहावयास मिळणार आहे. 18 वर्षांपेक्षा गोविंदांचे वय कमी नसावे असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने 14 वर्षांची मुलं गोविंदा पथकात सहभागी होवू शकतील असा निर्णय दिल्याने आयोजक मंडळी कमालीची खूशी दिसत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने दहीहंडी आयोजकांना जरी दिलासा मिळाला असला तरी. प्रत्येक गोविंदांच्या सुरक्षेच्या उपयांची काटेकोर अंमलबजावणी करायलाच लागेल अशी ताकीदही देण्यात आली आहे.

साहसी खेळ समजत उंचावर असलेली दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणार्‍या गोविंदा पथकांचे साहस. आणि बालगोविंदांच्या जीवाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन पूर्वी न्यायमुर्ती विद्यासागर कानडे व न्यायमुर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने 18 वर्षांखालील गोविंदांच्या सहभागाला आणि दहीहंडीची उंची 20 फुटांपेक्षा अधिक ठेवण्याला मनाई केली होती. परंतू आता 14 वर्षांखालील गोविंदाच्या सहभागावर बंदी आहे. आणि मनोर्‍याच्या उंचीवरील मर्यादा उठविली आहे. या निर्णयामुळे आता कोणते मंडळ कीती थर लावणार याची चर्चा गल्लोगल्ली रंगू लागली आहे.

यावर्षी उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर घातलेली मर्यादा उठविल्याने गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, उच्च न्यायालयाचा निर्णय उशिरा आल्याने काही मंडळांनी सरावच केला नसल्याचे सांगण्यर्चीं येत आहे. ज्या मंडळांनी सराव सरू केला आहे त्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. उंचीवर मर्यादा नसल्याने यंदाही थरांची स्पर्धा पाहायला मिळेलच यात शंका नाही. पूर्वी 40 फुटांपर्यंत थर रचून दहिहंडी फोडली जात होती. दहिहंडी उत्सवात लाखोंचा खर्च केला जातो. गेल्यावर्षीही लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र न्यायालयाच्या निर्बंधामुळे दहीहंडीच्या उत्सवातील मजाच निघून गेली होती. गोविंदा पथकांचीही नाराजी होती. उच्च न्यायालयाचा निर्णयामुळे गोविंदांमध्ये पुन्हा जोश संचारला आहे. दहीहंडीची उंची 30 ते 35 फूट असायलाच हवी. गेल्यावर्षी आनंदावर विरजण पडले असले तरी यंदा ही कमी दूर करण्यासाठी गोविंदांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

गेल्या काही वर्षात दहीहंडीच्या थरांवर बंदी नव्हती त्यामुळे अनेक गोविंदा जखमी झाले. काहींना प्राणासही मुकावे लागले आहे. त्यामुळे मागील वर्षी गोविंदाच्या वयावर व दहीहंडीच्या थरांवर सुप्रिम कोर्टाने निर्बंध घातले होते. सुप्रिमकोर्टाच्या या निर्बंधांना राज्यभरातून दहिहंडी मंडळांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्यांच्या या विरोधाचे फळीत की काय म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने सुप्रिमकोर्टाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणत गोविंदाची वयोमर्यादा 18 वरुन 14 वर्षांवर आणली आहे.

दहिहंडीच्या उंचीबाबतही शिथिलता आणल्याने गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण असून गोविंदा सरावामध्ये सहभागी होऊ लागले आहेत. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे राज्यभरात आता दहिहडी उत्सव पूर्वीप्रमाणाचे जल्लोषात साजरा होणार आहे. त्यामुळे पुन्हा ‘थर’थराट पहायला मिळेल.
प्रवीण शिंदे – 9892784348