मुंबई उपनगर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा आजपासून

0

मुंबई । मुंबई उपनगर अ‍ॅथलेटिक्स संघटना आयोजित जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. कांदिवलीच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानात खेळवण्यात येणार्‍या या स्पर्धेत जिल्हा संघटनेला संलग्न असलेल्या 65 संस्था, महाविद्यालयांचे सुमारे 2000 धावपटू विविध स्पर्धा प्रकारात सहभागी झाले आहेत.

तीन दिवस रंगणार्‍या या स्पर्धेतून आगामी राज्य अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचा प्रातिनिधीक संघ निवडण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संघटनेचे सहसचिव ऑर्थर फर्नांडेस यांच्याशी 9819942412 या क्रमांकावर संपर्क साधावा.