जळगाव : नऊ महिन्यापूर्वी मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. मात्र ही विमानसेवा सुरळीत नाही. मुंबई-जळगाव विमानसेवा गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. सेवा पुन्हा कधी सुरू होणार हेदेखील निश्चित नाही. त्यामुळे आता नव्या कंपनीस प्रस्ताव देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून केंद्र सरकारच्या माध्यमातून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
काल मंगळवारी सेवा पूर्ववत सुरू होईल, असे एअर डेक्कनकडून सांगण्यात येत होते. मात्र आजही विमान आले नाही. सेवा कधीपासून सुरू होणार याबाबत अनिश्चितता असल्याचे सांगितले जात आहे.