शिरपूर । आर्ट ऑफ लिव्हींगचे सर्वेसर्वा गुरुदेव श्रीश्रीरविशंकरजी यांच्या आशीर्वादाने जागतिक शांतीचा संदेश संपूर्ण जगाला देण्यासाठी पीस इज पॉसिबल हे मिशन घेवून मुंबई येथील बद्री पृथ्वीराज बलदवा (वय 72 वर्षे) यांनी पत्नी व चिमुकल्या नातीसह आपल्या कारने मुंबई ते लंडन प्रवासास प्रारंभ केला असून शिरपूर येथील नातेवाईकांना भेटून पुढील प्रवासास निघाले. या दरम्यान त्यांनी आर.सी.पटेल इंजिनिअरींग कॉलेजला आर्ट ऑफ लिव्हींगच्या साधकांसोबत त्यांनी अनेक अनुभव कथन (शेअर)केले. त्यांनी मुंबई येथून लंडन जाण्यासाठी कारने प्रवासास प्रारंभ केला आहे.
कारचे नाव सोहम : गोरेगाव-मुंबई येथील रहिवासी 72 वर्षीय बद्री पृथ्वीराज बलदवा हे पत्नी पुष्पा (वय 63 वर्षे) व नात निशी (वय 9 वर्षे) यांच्यासह आपल्या सोहम नाव ठेवलेल्या कारने मुंबई ते लंडन प्रवासास निघाले. शिरपूर येथील नातेवाईक मिश्रीलाल राठी, डॉ.किशोर राठी, डॉ. नलिनी राठी, प्रसिद्ध सी.ए. विजय राठी, सुनंदा राठी यांच्या निवासस्थानी येवून त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांची भेट घेवून त्यांनी आर.सी.पटेल इंजिनिअरींग कॉलेजच्या ऑडीटोरीअम हॉलमध्ये तासभर आर्ट ऑफ लिव्हींगच्या साधकांसोबत अनेक अनुभव कथन केले.
साधकांना केले मार्गदर्शन
याप्रसंगी सुरुवातीस आर्ट ऑफ लिव्हींग व कॉलेजतर्फे उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे, प्रा.सुहास शुक्ल, प्रशांत महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर बद्री पृथ्वीराज बलदवा, पत्नी पुष्पा, नात निशी यांच्यासह जनकभाई पटेल, मिश्रीलाल राठी, डॉ.किशोर राठी, डॉ. नलिनी राठी, सुनंदा राठी, डॉ.सुधीर भदाणे, विकास पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, प्रा.सुहास शुक्ल्, प्रा.नितीन पाटील यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हींगचे अनेक साधक उपस्थित होते.प्रारंभी विकास पाटील यांनी साधकांना मार्गदर्शन केले.
असा करणार प्रवास
भारत तसेच म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, कझखस्तान,उझबेकीस्तान, रशिया, पोलंड, चेकरिपब्लिक, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स यानंतर लंडन असा प्रवास होणार आहे. 18 आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हाप्रवासपूर्ण होणार आहे.एकूण 19 देशांमधूनव 100 मोठया शहरांमधून ते प्रवास करणार असून 72 वर्षीय बद्री बलदवाहे 72 दिवसांमध्ये21,000 कि.मी. एवढा प्रवास पूर्णकरतील. दररोज फक्तदिवस 8 ते12 तासात 350 ते 1000 कि.मी. एवढा प्रवास करणार आहेत.